Breaking News

नेवासा शहरातील एअरटेलची सेवा विस्कळीत

नेवासा - ( शहर प्रतिनिधी )- गेल्या चार दिवसापासून एअरटेल कंपनीची सेवा विस्कळीत झाल्यामुळे शहरातील ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एअरटेल कंपनीकडे तक्रार देवूनही काही उपयोग होत नसल्याने अनेक ग्राहक एअरटेल मोबाईल सिम कार्ड पोर्ट करण्याच्या तयारीत आहेत. अनेकदा कॉल करूनही मोबाईल कॉल जोडला जात नसल्याने शहरातील एअरटेल ग्राहक हैराण झाले आहेत. कॉल ड्रॉप होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहेत. इंटरनेट सेवेच्या तर अनेक दिवसाच्या तक्रारी आहेत. आजच्या सध्याच्या युगात मोबाईल शिवाय मानसाचे जिवन अवघड बनले आहेत. दैनदिन जिवनात मोबाईल हा एक अत्यावश्यक घटक झाला आहे. अनेक व्यवहार हे मोबाईल वर अवंलबून आहे परंतू एअरटेलच्या सेवेत चार दिवसापासून पुर्णता विस्कळीत झाले आहेत. मोबाईलचे नेटवर्क गायब होत आहेत, कॉल जोडला जावून देखील संभाषणाचा अवाज येत नाही. एक कॉल करण्यासाठी किमान दहा ते पंधरा वेळेस प्रयत्न करावा लागत आहे. अथक प्रयत्न करूनही कॉल जोडला गेला तरी समोरच्याचा आवाज येत नाही. कॉलच जोडले जात नसल्याने अनेकांचा गैरसमज होवून हमरी-तुमरी होत आहे. या विस्कळीत सेवेमुळे अनेकांची महत्वाची कामे खोळंबून पडले आहेत. थ्री जी सेवा असताना देखील पाहिजे तेवढा वेग इंटरनेटला मिळत नाही. या सदोष सेवेमुळे एअरटेल ग्राहक त्रासले आहेत. या संदर्भात ग्राहकांना तक्रार कुठे करायची हे समजत नसल्याने वैतागले आहेत. एअरटेल रेंज गायब झाल्याने ग्राहक मोबाईल रिचार्जवाल्यांशी हुज्जत घालत आहेत. संतापलेल्या ग्राहकांना कोण न्याय देणार हा महत्वाचा प्रश्‍न आहे. कारण एअरटेल कंपनीच्या कस्टमर केअरला तक्रार करून काहीच पदरात पडत नाही. त्यांच्या अधिकार्‍या पर्यंत पोहचण्यासाठी मोठे दिव्य ग्राहकांना पार पाडावे लागत आहे. या संदर्भात एअरटेल कंपनीने तातडीने दखल घेवून सेवा सुरळीत करावी अन्यथा मोबाईल कंपन्यांच्या विरोधात ग्राहक चळवळ उभारली जाणार आहे. गेल्या चार दिवसापासून मोबईल विक्रेते देखील हतबल झाले आहेत कारण नवीन मोबाईल विक्री केल्या नंतर आवाज येत नसल्याने ग्राहक मोबाईल खराब झाले असल्याचे सांगत मोबाईल परत घेवून पैसे परत देण्याची मागणी करत असल्याने विक्रेते वैतागले आहेत.