Breaking News

सर्व जाती आणि धर्मिय वधू - वर मेळाव्याचे आयोजन


सम्यक संकल्प फौन्डेशन अहमदनगर यांचेवतीने रविवार दि. 11 मार्च 2018 रोजी अहमदनगर येथील दादासाहेब विद्यालय (संबोधी विद्यालय) सिद्धी बागेजवळ सकाळी 11 ते 3 यावेळेत बौध्द आणि इतर जाती धर्माचा (सर्व धर्मीय) वधू-वर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी नाव नोंदणी संस्थेचे कार्यालय बालिकाश्रम रोड निलक्रांती चौक सुनिल प्रेशर पंपाशेजारी सुरू आहे. संपर्क राजेंद्र साळवे मो. 9850479424 या क्रमांकावर साधण्याचे आवाहन सत्येंद्र तेलतुंबडे, रविंद्र कांबळे, सुनिल निकम, बाळासाहेब ढेपे, बबनराव अहिरे, सतिष गायकवाड, मकरंद गायकवाड, अशोक पारधे, संतोष कांबळे, संदिप ठोंबे आदींनी केले आहे.