Breaking News

नेत्रशिबिराद्वारे ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न : कोल्हे


गरिबी, दरिद्रयता, मध्यमवर्गीयांना जाणविणारी अस्वस्थता आणि दिवसेंदिवस निर्माण होत जाणा-या समस्यांतून मनुष्याचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून या ऋणातून उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपिन कोल्हे यांनी केले.

संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजीवनी युवा प्रतिष्ठान, निलवसंत मेडीकल, रिसर्च फाउंडेशन आणि मणिशंकर आय हाॅस्पीटल यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उदघाटनप्रसंगी रवंदे येथे ते बोलत होते.

ते म्हणाले, की कोपरगांव मतदारसंघाचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी ‘मास्टर प्लॅन’नुसार येथे काम सुरू आहे. प्रारंभी संजीवनी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष संचालक साहेबराव कदम यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, संचालक निवृत्ती बनकर, अशोक भाकरे, कैलास माळी, चांगदेव कंक्राळे, मच्छिंद्र लामखडे, संदिप कदम, शिवाजी कदम, सखाहरी उगले, माहेगांव देशमुखचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, माजी सभापती सुनिल देवकर, अंबादास देवकर, बाळासाहेब निमसे, नामदेव घायतडकर, शशिकांत सोनवणे डाॅ. शुभांगी राठी, डाॅ. निकीता शहा, डाॅ. नवनाथ घोलप, कुणाल जगदाळे, प्रमोद चव्हाण, महेंद्र चौधरी, सविता तांदळे, दिपक जाधव, स्नेहल ठाकरे, मोहिनी गायकवाड आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील रहिवासी, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आदीसंह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, माजीमंत्री कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभेचे सभापती हरीभाउ बागडे, केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिर्डीच्या साई संस्थानचे अध्यक्ष डाॅ. सुरेश हावरे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री दिलीप वळसे आदींसह आजी माजी मंत्री, जिल्हयातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी संजीवनी कारखाना कार्यस्थळावर पाचशे झाडे लावण्यात आली. माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघातील विविध गावांत वृक्षारोपण, संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टीटयुटचे कार्यकारी विष्वस्थ अमित कोल्हे यांनी रक्तदान शिबिर, जीवनापयोगी वस्तूंचे वाटप, विविध स्पर्धा, दिव्यांगांना स्वावलंबनकार्डचे वाटप, महेश खडामकर यांनी लायन्स मुकबधिर विद्यालयातील मुलांना मिष्टान्न, आदिवासी बांधवांना गरजेच्या वस्तू देण्यात आल्या. संजीवनी कारखान्याचे व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, सचिव टी. आर. कानवडे यांनी पाच वर्षांतील मोफत नेत्रतपासणी शिबिर व शस्त्रक्रिया या उपक्रमांचा आढावा घेतला. संजीवनी कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. मनोज बत्रा यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.