Breaking News

संत किसनगिरी बाबा स्वच्छता सेवक मंडळाचा आण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठींबा


नेवासा, जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या सत्याग्रह आंदोलनाला पाठींबा म्हणून नेवासा तालुक्यातील करजगाव व लांडेवाडी येथील श्री समर्थ सदगुरु किसनगिरीबाबा स्वच्छता सेवक मंडळाच्या वतीने नेवासा तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून पाठींबा देण्यात आला.

 पाठींब्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. सध्या दिल्ली येथे लोकहितार्थ आण्णा हजारे यांचे सत्याग्रह आंदोलन सुरू असून या आंदोलनाला पाठींबा म्हणुन या सर्व सेवकांनी तहसीलदार यांना पाठींब्याचे निवेदन देऊन तहसीलच्या दालनातच मंगळवारी दि.27 मार्च रोजी ठिय्या मांडून धरणे आंदोलन केले .यावेळी स्वच्छता सेवक अशोक काळे, गोपीनाथ बेंबळे, रावसाहेब काळे, रावसाहेब लोहकरे, रामदास माकोणे, उमेश कंक, दिनकर टेमक,राधकीसन पुराने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.