आबासाहेब काकडे औषधनिर्माण शास्त्र महाविदयालयाचा पदवीदान समारंभ उत्साहात
शेवगाव, तालुक्यातील बोधेगाव येथील आबासाहेब काकडे औषधनिर्माण शास्त्र महाविदयालयाचा प्रथम पदवीदान समारंभ प्रमुख पाहूणे उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एफ.डीएल शिक्षण समुहाचे प्रमुख अँड. विदयाधर काकडे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, मध्यवर्ती शिक्षण समितीचे अध्यक्ष शिवनाथ देवढे, संपत दसपुते, प्राचार्य डाँ. पट्टन शशिकांत, महाविदयालयाचे परिक्षा विभाग प्रमुख डाँ. शांताराम खणगे, उपप्राचार्य महेश भालसिंग आदी प्रमुख उपस्थित होते.
या वर्षीचा महाविदयालयाचा निकाल 95 टक्के लागला असून 47 पैकी 35 विदयार्थ्यांनी पदवी प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक सोनाली बांभुळकर, व्दितीय विजय सम्राट, तृतीय जयश्री कोकाटे यांनी क्रमांक पटकाविले. यावेळी निचीत यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमास प्रथमच उपस्थित राहिल्याचे सांगुण पदवीधारक विदयार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सरकारी सेवेतील संधीबाबत मार्गदर्शन केले. तसेच संशोधन क्षेत्रात काम कऱण्यासाठी प्रेरीत करुन विदयार्थ्यांना स्टिफन हाँकींन्स सारख्या वैज्ञानिकांचे आदर्श डोळयापुढे ठेवून भविष्यकाळात काम करण्याचे आवाहन केले.अँड काकडे यांनी नोकरी करण्यापेक्षा व्यवसायाक काम कऱण्याचे आवाहन केले. तसेच विदयार्थ्यांच्या यशामागे असणा-या त्यांच्या पालकांचे व त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणा-या प्राध्यापकांचे कौतुक करत विदयार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसले, कचरु वाघमारे, माणिक गर्जे, गहिनीनाथ बडे, संजय आंधळे, राम अंधारे, बप्पासाहेब बर्डे, राधाकिसन शिंदे, डाँ. अरुण गोरे, जयदीप घोरतळे यांच्यासह पालक व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य डाँ. शशांक पट्टन यांनी तर सुत्रसंचालन कांच पंडीत यांनी केले. तर संचालक विकास गवळी यांनी आभार मानले.