पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाची जय्यत तयारी
दे. माळी, दि. 30 - दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अहिल्यादेवी होळकर यांच्या 257 व्या जयंती निमित्त दे.माळी येथ्ज्ञे भव्य महोत्सव आयोजित केला आहे. त्यामध्ये दि.31 मे ला सकाळी 7 वाजता मोटारसायकल रॅली ठाण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अंगणवाडी मध्ये सर्व अंगणवाडीतील मुलांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता भव्य रथामध्ये अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. या आयोजनामध्ये उपसरपचं विनोद फलके, समाधान मगर, पोलीस पाटील गजानन चाळगे, जय मल्हार सेना अध्यक्ष अर्जुन चाळगे तसेच मंडळाचे कार्यकर्ते गणेश शेळके, दिपक शेळके, धनंजय खोडवे, नंदकिशोर फलके, ज्ञानेश्वर चाळगे, बद्री चाळगे, ॠषीकेश चाळगे व सर्व गावकर्यांचे सहकार्य लाभत आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव 2016 निमित्त काढण्यात येणार्या भव्य रॅलीत गावातील व परिसरातील सर्व धनगर समाज बांधवांनी बहूसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मल्हार सेना देऊळगांव माळीच्या वतीने करण्यात आले आहे.