Breaking News

संप बेकायदेशीर : पंकजा मुंडे

विधानसभेत गोंधळ सुरू असताना मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहात निवेदन केले. यावेळी माहिती देतांना त्या म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत. सगळ्या मागण्या मान्य झाल्यानंतर 80 टक्के अंगणवाड्या सुरू झाल्यात. मात्र तरीही काही ठराविक संघटना आडमुठी भूमिका घेत संप सुरु ठेवतीये. त्यामुळे ’मेस्मा’ कायदा लावावा लागल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. कुपोषित बालक, स्तनदा माता यांना पोषण आहार दररोज देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे या अंगणवाडी सेविकांवर मेसमा लावला असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली. असे असले तरीही संघटनेसोबत चर्चा करण्याची तयारी असल्याचे मुंडे यांनी सांगितले.