Breaking News

एकबोटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी अटक झालेले हिंदू एकता आघाडी संघटनेचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना पुण्यातील सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी त्यांना सुनावण्यात आली होती. या प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना तीन दिवसांपूर्वी कोर्टात हजर करण्यात आल . तेव्हा त्यांना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली एकबोटेंना न्यायालय आवारात काळे फासण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर एकबोटे यांच्या समर्थकांनी काही काळ न्यायालयाच्या आवारात गोंधळ घातला. तसंच काही जणांनी मिलिंद एकबोटेंवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता. 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमा या ठिकाणी दोन गटांमध्ये हिंसाचार झाला होता. या हिंसाचारामागे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा आरोप होतो आहे. तसंच या दोघांविरोधात दंगली भडकवण्याचे,अ‍ॅट्रोसिटीचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी एकबोटेंना अटक झाली आहे तर भिडेंच्या अटकेची मागणी जोर धरते आहे.