Breaking News

रेशनच्या ‘पॉस’ मशिनमध्ये अनेक त्रुटी;दुकानदारांचा संपाचा इशारा


महाराष्ट्र शासनाने स्वस्त धान्य दुकानाचे कामकाज आँनलाईन करुन ‘पॉस’ मशीनचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे रेशनकार्डधारकांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. दुकानदारांनादेखील याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्र शासनाने सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातील गैरकारभार थांबविण्यासाठी आँनलाईन पद्धत सुरु करुन ‘पॉस’ मशिनच्या सहाय्याने अंगठ्याचे ठसे घेऊन आँनलाईन बिल काढून धान्य वाटप सुरु केले आहे. मात्र या मशिनमध्ये अनेक त्रुटी अाहेत. काही वेळेस रेशनकार्डवरील नाव चुकीचे असल्याने तर काही वेळेस अंगठ्याचे ठसे मँच होत नाही. बराचवेळा पाँश मशिनची रेंज खंडीत होत असल्याने मशिनमधून बिल निघत नाही. अशा अनेक अडचणीमुळे गोरगरीब जनतेला तासनतास दुकानासमोरील रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे तर अनेकांना ‘पॉस’ मशिनच्या त्रुटीमुळे धान्य मिळत नाही. यामुळे दि. १ एप्रिलपासून सर्व धान्य दुकानदार संप पुकारणार आहेत.