Breaking News

रस्ते व पुलांच्या कामांसाठी 22 कोटी रूपयांची तरतुद


राज्याच्या सन 2018 - 19 च्या अर्थसंकल्पात पारनेर - नगर मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या कामांसाठी 22 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आल्याची माहिती आ. विजय औटी यांनी पत्रकार परिषदेत दिली. भौगोलिक दृष्टया हा मतदारसंघ मोठा असल्याने औटी यांनी रस्ते तसेच पुलांच्या कामांसाठी भरीव निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने मतदारसंघातील दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. पारनेर, जामगांव, भाळवणी रस्त्याच्या सुधारणेसाठी 3 कोटी 40 लाख, कान्हुरपठार, वेसदरे, वडझिरे रस्ता सुधारणेसाठी 2 कोटी 54 लाख, घोसपुरी, रांजणगांव मशिद रस्ता दुरूस्तीसाठी 2 कोटी 48 लाख, पारनेर बाबुर्डी रस्ता सुधारणेसाठी 3 कोटी 25 लाख, वाकोडी, बाबुर्डी रस्ता सुधारणेसाठी 4 कोटी, निंबळक, चास, खंडाळा, बाबुर्डी रस्ता सुधारणेसाठी 4 कोटी 39 लाख, पळवे, पाडळी रस्त्यावरील पुलासाठी 98 लाख 95 हजार, निंबळक, चास, खंडाळा, बाबुर्डी रस्त्यावर बाबुर्डी गावाजवळ पुल बांधण्यासाठी 10 कोटी रूपये मंजुर करण्यात आल्याचे आ. औटी यांनी सांगितले. मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासाकडे लक्ष देताना दळणवळण सुलभ व्हावे यासाठी मतदार संघातील बहुतांश रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आपण गेल्या तेरा वर्षांच्या कालावधीत जाणीवपूर्वक लक्ष दिले. त्यामुळेच मतदार संघात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे.