Breaking News

शिष्यवृत्तीसाठी स्टॅम्प पेपरवरील हमीपत्राची अट रद्द

जळगाव, दि. 07, मार्च - केंद्र व राज्य शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदि योजनांचा अनुज्ञेय निर्वाह भत्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा क रण्यासाठी विहित केलेल्या हमी पत्रावर महाविद्यालयाने आपले संमतीपत्र विद्यार्थी पात्रतेबाबतचे हमीपत्र शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर देणे बंधनकारक केलेले होते. यामध्ये 26 फे ब्रुवारी, 2018 च्या शासन निर्णयान्वये बदल करण्यात आला असून आत हे हमीपत्र विद्यार्थी व पालकांनी साध्या कागदावर महाविद्यालयाकडे सादर करण्यास मान्यता दिली आहे.
त्यानुसार आता कोणत्याही विद्यार्थ्यांस पात्रतेबाबतचे हमीपत्र शंभर रुपयांच्या स्टॅमप पेपरवर देणे बंधनकारक असणार नाही. त्याऐवजी विहित केलेले हमीपत्र विद्यार्थी व पालकांनी साध्या कागदावर महाविद्यालयाकडे सादर करावे. तसेच महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यार्थी व पालकांकडून हमीपत्र साध्या कागदपत्रावर घेण्यात यावे,असे आवाहन खुशाल गायक वाड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.