Breaking News

श्रीगोंद्यातील काशीकुंडात एकाचा मृत्यू


शहरातील सरस्वती नदी लगत सिध्देश्‍वरांचे मंदिर आहे. या ठिकाणी एक पुरातन बारव असून त्याला काशीकुंङ म्हणून ओळखले जाते. या काशीकुंडामध्ये नारायण रामचंद्र हरीहर या 40 वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मुत्यू झाल्याची घटना काल सकाळी 11 वा, काही महिला सिध्देश्‍वर दर्शन घेऊन काशी कुंङाचे दर्शन घेण्यासाठी गेल्या असता त्यांना सदर व्यक्तीचा मुतदेह पाण्यावर तंरगत असल्याचा दिसून आला. त्यांनी ही माहिती तेथील काही युवकांना दिली. त्यावेळी परिसरात युवक नेते सागर गोरे, चोराचीवाडीचे संरपंच संतोष शिंदे यांनी पो.हवालदार दहिफळे व अन्य पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला, असता पाहण्यासाठी आलेल्या गर्दीतील अनेकांनी त्यांना ओळखले. सदर व्यक्ती ही मूळ बारामतीचे असून श्रीगोंदा येथील नातेवाईकांकडे राहतात. तयाचबरोबर मोलमजूरी करून ते आपली उपजिविका चालवत होते. त्यांना तीन मुली व पत्नी असा परिवार आहे. त्यांचे नातेवाईक गणेश अविनाश चव्हाण यांच्या माहितीवरून श्रीगोंदा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.