तक्षशीला ज्युनियर कॉलेज व इंग्लिश मेडीयम स्कूलमचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


बालाजी देडगाव/प्रतिनिधी/- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तक्षशीला ज्युनियर कॉलेज व इंग्लिश मेडीयम स्कूलमचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिलियम पार्क उद्योगसमुहाचे संचालक गणेश शेटे होते .तर प्रमुख मान्यवर म्हणून उद्योजक सोनल चोपडा , डॉ.अविनाश काळे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी उपसभापती कारभारी चेडे, दत्ता मुंगसे, लक्ष्मण तांबे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध हिंदी, मराठी गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले. तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिका सादर केल्या. तसेच विविध देशभक्तीपर गितांचे सादरीकरण केले. यावेळी आपल्या चिमुकल्यांचे कौतुक करताना पालकांनी बक्षिसांचा वर्षाव केला. यावेळी वर्षभरात विविध स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.गणेश शेटे, डॉ. अविनाश काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला जालिंदर कदम, राजेंद्र कदम, संजय कदम, दत्तात्रय कदम, दिपक गडाख, रोहिणी काळे, अनिल कोलते, दत्तात्रय शिंदे, दिपक कोलते, पारुल पटवा, मधुकर क्षीरसागर, डॉ.गणेश लंघे, लक्ष्मण गोयकर आदी मान्यवर उपस्थित होते.