Breaking News

तरूणाने गोळी झाडून केली आत्महत्या


नेवासा/ तालुका प्रतिनिधी/- शहरातील कडू गल्ली येथील राहणाऱ्या संकेत पांडुरंग घोरतळे (वय २२) या तरूणाने मंगळवार ,२७ फेब्रुवारीच्या रात्री साडे बाराच्या सुमारास राहत्या घरी डोक्यात गावठी कट्यातून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी गावठी कट्टा व पोंगळी त्याच्या घरातून ताब्यात घेतली आहे. पोलिसात गुन्हा दाखल झालेला नसून अद्याप त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. 

संकेतचे नातेवाईक पोलिस उपनिरिक्षक प्रमोद भिंगारे, संदिप दरंदले, संदिप आजबे, बाळू नागरगोजे, जयवंत तोडमल यांनी त्याला तातडीने नगर येथे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. तेथे उपचार सुरु असतांना संकेत घोरतळे याचा बुधवार,२८ फेब्रुवारीला सकाळी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह औरंगाबाद येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण नेवासा शहरात खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.