नाणार प्रकल्प होऊ देणार नाही - नारायण राणे
मुंबई, दि. 16, मार्च - तुम्ही कितीही ताकद लावली तरी नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आज दिला. नाणार रिफायनरी प्रक ल्प नको अशी मागणी करत प्रकल्प ग्रस्तांनी आज मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केले. यावेळी नारायण राणे यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. नारायण राणे यांच्यासह निलेश राणे देखील आझाद मैदानात दाखल झाले होते. नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे कोकण उद्ध्वस्त होणार असल्याचे सांगत राणेंनी यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर जोरदार प्रहार केला.
या प्रकल्पासाठी एमआयडीसीकडे जागा मागितली गेली आणि देसाईंनी ती दिली तर पर्यावरण मंत्र्यांनी पर्यावरण खात्याची परवानगी दिली मग विरोध कसला करता. एकीकडे उद्धव ठाकरे सत्तेत आहेत आणि दुसरीकडे विरोध करत आहेत म्हणजे शिवसेना डबल गेम खेळत आहे, असा आरोप यावेळी नारायण राणे यांनी केला. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत रिफायनरी प्रकल्पाला पाय ठेवू देणार नाही असेही राणेंनी यावेळी स्पष्ट केले.