राममंदीराच्या जिर्णोध्दार ग्रामस्थांनी केला निर्धार!
आश्वी : प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे ग्रामस्थांनी येथील ऐतिहासिक व पुरातन राम मंदीराचा जिर्णोध्दार करण्यासाठी गटातटाचे राजकारण न करता एकत्र येत रामनवमीला भूमिपुजन केले.
आश्वी बुद्रुक येथे सुमारे दिडशे वर्षांपुर्वीचे ऐतिहासिक पुरातन असे श्री राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, माता सिता यांचे संयुक्त उत्तर मुखी मंदिर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हे एकमेव मंदिर आहे. येथील मंदिरासमोर दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे. येथे रविवारी रामनवमीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी रिपाइं राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी प्रभू श्री राममंदिराच्या जिर्णोध्दारचा प्रश्न उपस्थित केला. मांची हिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर यांनी प्रभू श्री रामचंद्रांचा जीवनपट तरूण पिढीला मार्गदर्शक असल्याचे उदाहरणासह सांगितले. यासाठी होडगर यांनी १ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. याप्रसंगी विनायकराव बालोटे यांनीही १ लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. रविंद्र गायकवाड यांनी पाचशे एक रुपये रोख देत देणगीचा शुभारंभ केला. व्यापारी वसंत बोरा यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले.
यावेळी सुशील भंडारी, भाऊराव कांगुणे व योगेश नाके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड, विजय चतुरे, नंदकुमार कुलथे, सुमतीलाल गांधी, शामसुंदर बिहाणी, सतिश गोडगे, कैलास लाहोटी, सुभाष म्हसे, भाऊसाहेब जऱ्हाड, रमेश धर्माधिकारी, केदार बिहाणी, नामदेव मदने, धनराज गांधी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.