Breaking News

भाविकांच्या टेम्पोला अपघात


राहुरी : जालना येथून शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या दोन टेंम्पोंचा राहुरी शहर हद्दीत नगर मनमाड रोडलगत अपघात झाला. यात एका टेम्पोने पलटी मारल्याने १० ते १५ जण गंभीर जखमी तर ५ ते ६ जण किरकोळ जखमी झाले. आज {दि. २६} दुपारी ही घटना घडली. जालना जिल्ह्यातील सावखेडा तालूका भोकरदन येथील सुमारे ४० ते ५० जण रामनवमीनिमित्त दोन ४०७ टेम्पो भाडोत्री करुन शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते. काल साईबाबाचे दर्शन घेऊन शिर्डी येथून शिंगणापूरकडे निघाले असता राहुरी शहर हद्दीत नगर मनमाड रस्त्यालगतच्या एका हाँटेलसमोर हा अपघात झाला.