Breaking News

भिवंडीत इंटरनेट केबल व्यावसायिकावर गोळीबार

ठाणे, दि. 01, मार्च - भिवंडीमधील पटेलनगर येथे दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी इंटरनेट केबल व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. जैनुद्दीन मलबारी केबल व्यावसायिकाचे नाव असून ते या गोळीबारातून थोडक्यात बचावले आहेत. 


केबल व्यावसायिक जैनुद्दीन मलबारी व जावेद फारुकी हे दोघे मित्र काल रात्री उशीरापर्यंत बोलत थांबले होते. त्यावेळी अचानक एका दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही.