Breaking News

प्रशिक्षण कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी, दि. 01, मार्च - केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या संकल्पनेतून परिवर्तन केंद्रच्या ग्रामविकास उपक्रमातर्गत लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या वतीने होडावाडा येथील मराठे मंगल कार्यालय येथे आयोजित पंचायत राज शिबिरास पंचक्रोशीतील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रशिक्षण शिबिरात प्रामुख्याने एप्रिल 2018 पासून स्थानिक स्वराज्य संस्था साठी महत्व पूर्ण अशा ऑनलाईन प्रशासकीय प्रक्रियांतर्गत आर्थिक व्यवहार, दप्तर, प्रशासकीय नोंदी, अंदाजपत्रक व वार्षिक आराखडा अशा ग्रामपंचायत - पंचायत समिती- जिल्हा परिषद आशा त्रिस्तरीय कार्य प्रणाली बाबत सखोल व सविस्तर माहिती महेश चव्हाण यांनी दिली यावेळी त्यांनी अशा स्वरूपातील ग्रामपंचायतीचे प्रशिक्षण शासन स्तरावर येत्या काही दिवसात होणार असून याची पूर्व तयारी या प्रशिक्षणात होत असल्याचे सांगून आयोजक लुपिन फाउंडेशन व वेताळ प्रतिष्ठानचे कौतुक यावेळी चव्हाण यांनी केले. तसेच लुपिनचे प्रकल्प अधिकारी नारायण परब यांनी 14व्या वित्त आयोगांतर्गत निधीचे व्यवस्थापन व सदस्य व सरपंच यांनी वैयक्तिक स्तरावर कामकाजात नवोपक्रम कसे राबवावे याबाबत मार्गशन केले.