Breaking News

सैनिकांना मिळणार अत्याधुनिक शस्त्रास्त्रे

नवी दिल्ली : देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणार्‍या भारतीय सैनिकांच्या हाती अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पडणार आहेत. केंद्र सरकारने नुकतीच नवीन शस्त्रखरेदीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. दहा दिवसांच्या आत हा करार निश्‍चित केला जाणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या सुत्रांनी सांगितले.

सीमारेषेवर तैनात असलेल्या सैनिकांना अत्याधुनिक शस्त्रात्रे पुरविण्याची मागणी पुढे आली होती. त्यानुसार केंद्र सरकारने नवीन शस्त्र खरेदीला हिरवा कंदिल दिला. आधुनिक रायफल्स, लाइट मशीन गन आणि क्लोजक्वार्टर बॅटल कार्बाइन्स यांचा खरेदी प्रस्तावात समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 72400 आधुनिक रायफल्स, 93895 क्लोजक्वार्टर बॅटल कार्बाइन्स, आणि 16479 लाइट मशीन गनची खरेदी केली जाणार आहे. याकरता निवडक परकीय शस्त्र कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. खरेदीसाठी 5 हजार 366 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती आहे. खरेदी प्रक्रियेत होणारा विलंब टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर गतिमान हालचाली सुरू आहेत. दहा दिवसांच्या आत हा करार निश्‍चित केला जाणार आहे. येत्या वर्षभराच्या आत ही शस्त्रास्त्रे भारताला मिळण्याची शक्यता आहे.