Breaking News

नीरव मोदीच्या 36 कोटींच्या संपत्तीवर टाच

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी सांगितल्यानुसार पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळा चौकशी संबंधात फरार हिरे व्यापारी नीरव मोदीची 36 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ईडी आणि सीबीआयच्या पथकांकडून संयुक्तपथकाने नीरव मोदीच्या मुंबई येथील समुद्र महालची झडती घेण्यात आली. ही कारवाई गुरुवारपासून शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती, अशी माहीती ईडीच्या एका अधिकार्‍याने दिली आहे. या, कारवाईत 10 कोटी रुपयांची हिर्‍याची अंगठी, 15 कोटी रुपयांची प्राचीन आभूषणे, 1,40 कोटी रुपयांचे अत्याधुनिक घड्याळ आणि एम.एफ.हुसैन, के.के हेबर आणि अमृता शेरगिल यांचे 10 कोटी रुपयांचे पेंटिंग्स जप्त करण्यात आले आहे. 

पीएनबी घोटाळाप्रकरणी नीरव मोदी आणि गीतांजली जेम्सच्या मेहुल चोकसीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने आतापर्यंत देशभरात 251 हून अ धिक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. यात हिरे, सोने, मोती आदी जप्त करण्यात आले होते. या शिवाय ईडीने नीरव मोदी समूह आणि मेहुल चोकसी समूहाशी संबंधित 7,638 क ोटी रुपयांची स्थावर मालमत्ताही जप्त केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने पहिला गुन्हा दाखल करण्यापूर्वीच जानेवारी महिन्यादरम्यान चोकसी आणि निरव मोदी हे देश सोडून पळून गेले आहेत.