Breaking News

केईएम रुग्णालयाच्या छताचे प्लास्टर कोसळले; दोन रूग्ण जखमी


केईएम रुग्णालयाच्या छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन रूग्ण जखमी झाले असून त्यांना दुसरीकडे हलविण्यात आले आहे. दुसर्‍या मजल्यावरील डायलिसिस विभागाच्या छताचे प्लास्टर कोसळले आहे.

केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. काही वर्षांपूर्वीच केईएम रुग्णालयामध्ये नुतनीकरण झाले होते. मात्र, छताचे प्लास्टर कोसळल्यामुळे रूग्णालयामधील सुरक्षा आणि दुरावस्थावर पुन्हा एकदा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.