Breaking News

ञ्यंबकेश्‍वरचा केशर आंबा युरोपला होणार एक्सपोर्ट

नाशिक - ञ्यंबकेश्‍वर तालुक्यात असणारे हरसुल परिसरातील केशर आंबा युरोपला एक्सपोर्ट करण्यात येणार आहे. हरसुल हे गाव सुप्रसिध्द धावपटु कविता राऊत यांच्यामुळे जगभरात पोहचला आहेच. तसेच दुर्गम डोंगराळ भागात राहणा-या या आदिवासी शेतकरी कुटुंबाने एकरी तीन लाखांची हमी देणारी केशर अंब्यांची लागवड हा अनोखा प्रयोग ठरला आहे. सुंदराबाई वाघेरे आणि विलास भोये या दोन शेतक-यांना कृषी खात्याने नुकतेच आंबा एक्सपोर्ट प्रमाणपत्र दिले आहे. 


हरसुलच्या अलीकडे साधरणत: पाच किलोमीटर अंतरावर चिंचवड हे गाव आहे. येथील शेतकरी जनार्दन वाघेरे हे नोकरीत आहेत त्यांचे आईवडील सुंदराबाई आणि दामोदर वाघेरे या कुटुंबाने या प रिसरात 5000 केशर अंबा झाडे लावली आहेत. झाडे लावतांना त्यांनी जंगली आंबा आणि केशर यांचे कलम स्वता तयार केले 3 बाय 14 फुटावर एकरी हजार झाडांची लागवड करण्यात आली. साधरणत: पाच वर्षांपासून त्यांचे प्रयोग सुरू आहेत. नदीला असलेल्या पाण्याचे ठिबक करून त्यांनी टंचाईवर मात केली आहे. काही वर्षांपुर्वी ते पारंपारीक भात शेती करत असत तेव्हा त्यांना उत्पादन खर्च 40 हजार होत असायचा आणि उत्पन्न 45 हजार मिळत असल्याने आतबटटयाचा हा धंदा बंद केला पाहिजे असे मनावर घेतले.स्वता जनार्दान वाघेरे हे कृषी पदविका धारक आहेत त्यांच्या सोबत अमोल भोये, नितीन भोये या उच्चशिक्षीतांनी एकत्रीतपणे शेतीत प्रयोग राबविण्याचे ठरविले.त्यांनी मोबाईलच्या ऑनलाईन सेवेचा ख-या अर्थाने लाभ घेतला आहे.इंटरनेटवर सर्च क रत इस्त्रयल व जर्मन कृषी तंत्रज्ञान समजावून घेतले व त्यामध्ये या भागातील वातावरण आंबा पिकासाठी योग्य असल्याने त्यांनी केशर आंब्याची लागवड केली.दोन वर्षात फलधारणा झाली त्यानंतर गतवर्षी हंगामात त्यांनी सेंद्रिय पध्दतीने आलेला आंबा पिकवून तो जागेवर 50 रूपये किलो भावाने विकला.गत वर्षी 6 टन केशर आंबा विकल्याचे ते सांगतात.
झाडांना सेंद्रिय खते घालणे आणि फवारणी करतांना रसायनांचा वापर करायचा नाही त्याच सोबत आंबा पिकावतांना त्यासाठी कोणताही रासायनीक पदार्थाचा वापर केला नाही. वर्तमान पत्राचा क ागत वापरत पंधरा दिवसात आंबा पिकवण्याचे तंत्र त्यांनी विकसीत केले आहे.गतवर्षी माहिती पडेल तसे शहरीभागातून ग्राहक आंबा खरेदीसाठी येत होते.जागेवर 50 रूपयांचा भाव मिळाल्याने ग्राहकांसह उत्पादक दोन्ही घटकांना फायदेशीर ठरले.यावर्षी आपण आंबा निर्यात करायचा असे वाघेरे यांनी ठरवले आणि त्यासाठी सर्व सोपस्कार पुर्ण केले आहेत. त्यांच्या सोबत तेथील विलस भोये हे दुसरे शेतकरी देखील एक्सपोर्ट क्वालीटी आंबा उत्पादन घेत आहेत.त्यांच्याकडे 1500 झाडे आहेत.
आंबा निर्यातीच्या गुणवत्तेचा होण्यासाठी काळजी घेतली जाते.या आंब्यांना लावण्यासाठी थायलंड येथून खास पिशव्या मागवण्यात आल्या आहेत.विलास भोये हे देखील उच्चशिक्षीत आहेत.शेतीत प्रयोग करत असतांना हे शेतकरी कलींगडाचे अंतर पीक देखील घेतात. जनार्दन वाघेरे, अमोल भोये, नितीन भोये हे देशातील आणि विदेशातील शेतक-यांना उत्पादन वाढीसाठी मागर्दशन करतात त्याकरिता युटयुब सारख्या सोशल माध्यमाचा प्रभावी वापर करत आहेत. या शेतक-यांना पाच वर्ष आंबा निर्यातीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. यावर्षी 120 ते 150 रूपयांपर्यंत भाव मिळाल्यास 5 एक रात 15 ते 16लाख रूपयांचे उत्पादन आपेक्षीत आहे.