बनावट मोबाईलची विक्री करून नागरिकांची फसवणूक करणारा आरोपी गजाआड
मी जळगाव येथून कासला फिरण्यासाठी आलो आहे. माझे सर्व मित्र मला सोडून कासला गेले आहेत. माझ्या गाडीतील पेट्रोल संपले असा बहाणा करून सॅमसँग कंपनीचा एसएमजे-7 प्राईम मॉडेल हा बनावट मोबाईल खराअसल्याची बतावणी करून संभाजीनगर कोडोली येथील गजानन बॅटरी या दुकानात 8 हजार 500 रूपयांना विकून फसवणुक करणारा भामटा कन्हैयलाल देविदास बेलतदार (वय 24, एरंडोल, जि. जळगाव यास सायबर विभागाच्या पथकाला सापळा रचून गजाआड करण्यात यश आले.
दरम्यान बनावट कंपनीचे मोबाईल कमी किमतीत विक्री करणारी टोळी सक्रीय झाली आहे. नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी काळ्या रंगाच्या बजाज पल्सर क्रमांक एम. एच. 19, सीटी- 5125 वरून संभाजीनगर कोडोली येथील गजानन बॅटरी या दुकानात आला. आम्ही जळगाव येथून कासला फिरण्यासाठी आलो आहोत. माझे सर्व मित्र मला सोडून कासला पुढे गेले आहेत. माझ्या गाडीतील पेट्रोल संपले आहे. माझ्या जवळील सॅमसँग कंपनीचा एसएमजे-7 प्राईम मॉडेल मोबाईल दुकानातील प्रशांत रामचंद्र जगदाळे, वय 35, रा. संभाजीनगर यांना 8 हजार 500 रूपयांना विकला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रशांत जगदाळे यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सायबर पोलीस ठाण्याचे पो. नि. पद्माकर घनवट यांनी आरोपीची तात्काळ माहिती मिळवली. तो वसई, ठाणे येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून आरोपीस अटक केली.