Breaking News

खासगी व्यापार्‍यांकडून कापूस उत्पादक शेतकर्‍यांची लूट


आधीच अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पादन कमी झाले असताना व बोंडअळी ने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झालेले आहे. एकरी तीन ते चार क्विंटल कापसाचे उत्पादन झालेले आहे. कमी उत्पादनामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे. उत्पादन कमी अन् खर्च जादा झालेला असून खाजगी व्यापारी कापूस उत्पादक शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात लूट करत आहेत. हमीभावापेक्षा 700 ते 800 रुपये क्विंटल कमी दराने खाजगी व्यापारी कापूस खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात लूट करत आहेत. या लुटीकडे प्रशासन झोपेच सोंग घेऊन शांत बसलेले आहे. तरी संबंधित यंत्रणेने बाजार समितीने याकडे लक्ष देऊन खाजगी व्यापार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे. अन्यथा याबाबत शेतकरी संघटना जन आंदोलन उभारून प्रशासनाला याचा जाब विचारेल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड व दत्ता फुंदे यांच्या सह्या आहेत.