संजीवनी युवा प्रतिष्ठानने समाजकार्याचा यज्ञ आरंभिला : कोल्हे
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जळगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गंगाधर चौधरी होते. यावेळी सरपंच सुमन वैराळ, उपसरपंच अण्णासाहेब चौधरी, शिवाजीराव लहारे, बाळासाहेब वाघ, भिमराज लहारे, विजय चौधरी, अण्णासाहेब चौधरी, माधुरी चौधरी, महेंद्र चौधरी, दत्तात्रय चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, विजय चौधरी आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. विवेक कोल्हे म्हणाले, संजीवनी उद्योग उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी कोपरगांव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी प्रत्येक योजना स्वतः लक्ष देऊन जाणीवपूर्वकरित्या राबविण्याचा तत्कालीन सभापती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जिल्हा सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष तथा संचालक असतांना प्रयत्न केले आहेत. आ. स्नेहलता कोल्हे यांनीही गेल्या साडेतीन वर्षांत विकासाच्या योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोटयावधीचा निधी आणला आहे. नाशिकचे निलवसंत मेडीकल व रिसर्च फाउंडेशन तसेच मणिषंकर आय हाॅस्पीटलच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षांपासून मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया अभियान सुरू केले. ग्रामीण भागातील रूग्णांचा वाढता सहभाग यात प्रामुख्यांने दिसुन आला. सूत्रसंचलन संपत चौधरी यांनी केले. भाऊसाहेब चौधरी यांनी आभार मानले.