दखल - भाजपला आणखी एक धक्का
भारतीय जनता पक्षाच्या मागचं शुक्लकाष्ठ काही संपायला तयार नाही. वादग्रस्त वक्तव्यं करून भाजपचे नेते पक्षाची अडचण वाढवीत असताना दुसरीकडं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून एक एक मित्रपक्ष बाहेर पडण्याची तयारी करीत आहे. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडली. शिवसेनेनं स्वबळाचा नारा लावला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सोडचिठ्ठी देताना लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली आहे. तेजस्वी यादव यांच्यासमवेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. भाजप आणि तेलुगू देशम पक्षात (टीडीपी) गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आता आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपबरोबर असलेली युती तोडण्याची त्यांनी धमकी दिली आहे. मी कधी मित्र धर्म सोडलेला नाही. जर त्यांनी माझं ऐकलं नाही, तर मी नमस्कार करून माझ्या मार्गानं जाईल, अशा शब्दांत चंद्राबाबूंनी भाजपला इशारा दिला आहे. मध्यंतरी नायडू यांची नाराजी दूर करण्यासाठी आंध्रप्रदेशाला बाराशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. तरीही नायडू यांची नाराजी दूर झालेली नाही, हे त्यांच्या ताज्या वक्तव्यातून स्पष्ट होते. केंद्र सरकारकडून राज्याला देण्यात आलेली आश्वासनं पूर्ण होत नसल्यामुळं लोकांमध्ये असंतोष पसरत असल्याचं काही दिवसांपूर्वी चंद्राबाबूंनी म्हटलं होतं. सीआयआयच्या परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. टीडीपीनं अर्थसंकल्पात आंध्रप्रदेशला जास्त महत्व न दिल्यामुळं संसदेच्या कामकाजात अडथळा आणला होता. नायडू म्हणाले, की सन 2014 मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा राज्य वेगळं करताना आंध्रप्रदेशवर मोठा अन्याय झाला आहे; पण राज्याच्या विकासासाठी मी कठोर मेहनत घेत आहे. जास्तीत जास्त लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर एनडीएतून बाहेर पडणारे मांझी दुसरे नेते आहेत. मांझी यांच्या या निर्णयामुळं भाजपला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातं. मांझी गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांची भेट घेतल्यानं त्यांची नाराजी उघड झाली होती. मांझी यांनी बुधवारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन एनडीएतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. मांझी जहानाबान येथील पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवारीसाठी इच्ुक होते; पण त्यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली होती. यानंतर मांझी यांनी, ‘एनडीएत प्रत्येक ाला काही ना काही दिले जात आहे; मात्र मीच एकटा असा आहे; ज्याला काही मिळत नाही,’ असं त्यांनी म्हटलं होतं. राष्ट्रीय जनता दलाचा नेता भोला यादव यांनी मांझी यांना ऑफर दिली होती. त्यानंतर आज मांझी यांनी तेजस्वी यादव यांच्यासह भोला यादव यांची भेट घेतली. ही भेट होळीनिमित्त असल्याचं भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या नेत्यांनी म्हटलं होतं; परंतु ते आता तोंडघशी पडले आहेत. बिहारचे राज्यमंत्री प्रेमकुमार यांनीदेखील ही भेट होळीनिमित्त असल्याचं म्हटलं होतं. दुसरीकडं मध्यप्रदेशमध्ये भाजपनं दोन्ही पोटनिवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. तरीही तिथं काँगे्रसचे उमेदवार आघाडीवर होते. या वर्षाअखेर विधानसभेच्या निवडणुका असल्यानं त्याचं आता काँगे्रस भांडवल क रील, यात शंका नाही. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना एकामागून एक धक्के बसत असताना केंद्रीय मंत्री थावरसिंह गेहलोत यांनी मात्र अपंगाचा अवमान करून आणखी एक ा वादाला तोंड फोडलं आहे. मध्यप्रदेशमधील राजगढ येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग व अंत्योदय मेळाव्यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी एका दिव्यांग व्यक्तीचा अपमान केल्याचं उघड झालं आहे. संबंधित व्यक्ती गेहलोत यांच्या पाया पडत आपणासही एक ट्राय सायकल द्यावी अशी विनंती करत होती; पण गेहलोत यांनी पाया पडल्यानं सायकल मिळत नाही, असं दरडावून सांगत त्याला चक्क झिडकारलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सर्वस्तरावर गेहलोत यांच्यावर टीका होत आहे. येथील जिल्हा मुख्यालयात नुकतेच दिव्यांग व अंत्योदय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात 529 दिव्यांगांना 52 लाख रुपये व ट्राय सायकलचं वाटप करण्यात येणार होतं. त्यामुळं आजूबाजूच्या गावातील दिव्यांगांनाही सकाळपासूनच इथं मोठी गर्दी केली होती; मात्र दिव्यांगांसाठी व्यासपीठावर जाण्याची कुठलीच विशेष सोय करण्यात न आल्यानं अनेक दिव्यांगाना व्यासपीठापर्यंत पोहचणं शक्य नव्हतं. दुपारचे चार वाजले, तरी सामाजिक न्याय मंत्र्याचा पत्ताच नसल्यानं कडकडीत उन्हात दिव्यांग ताटकळत बसले होते. चार नंतर गेहलोत कार्यक्रमस्थळी आले. त्यांना बघताच दिव्यांगांनी एकच गलका केला. त्यानंतर त्यांच्या हस्ते दिव्यांगाना ट्राय सायकलचं वाटप करण्यात आलं. त्याचवेळी गदीर्तील एका दिव्यांगानं गेहलोत यांच्या पायावर अक्षरशः लोळण घेत मलाही ट्राय सायकल द्या, अशी कळकळीची विनंती केली. दिव्यांगाच्या या वागण्यामुळं गेहलोत यांचा पारा चढला आणि पाया पडल्यामुळं सायकल मिळणार नाही, तर त्यासाठी अर्ज करावा लागतो असं ओरडून सांगत त्यांनी दिव्यांगाला ढकलून दिलं. या कार्यक्रमासाठी ‘मीडिया’लाही बोलावलं होतं. गेहलोत यांचं हे मुजोर कृत्य अनेकांनी आपल्या कॅमेर्यात टिपलं व ‘सोशल साईट’वर टाकलं.