बेकायदा वाळू उपसा; जिल्हाधिकार्यांची धडक कारवाई
राहुरी/श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी : तालुक्यातील आंबी दवनगाव येथील प्रवरानदी नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा होत असल्याची तक्रार राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर तक्रार करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्यासह राहुरी पोलिस निरिक्षक राहुरी व श्रीरामपूरचे तहसिलदार यांनी प्रथमच जंबो कारवाई करण्यात आली. यामधे तीन जेसीबी 15 ते 20 डंपर यासह मोठया प्रमाणात वाळू साठा जप्त करण्यात आला.
प्रवरापात्रात अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. आंबी दवनगाव येथे गेली अनेक वर्षांपासून वाळू उपसा होत असल्याची तक्रार ‘आपले सरकार’ या पोर्टलवर एका कार्यकर्त्याने केली होती. ही माहिती जिल्हा अधिकारी महाजन यांना मिळाल्याने त्यांनी अचानक फौजफाट्यासह वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी छापा मारला. जिल्हाधिकारी महाजन यांचा छापा पडल्याचे वाळू तस्करांना समजताच काही मजूर वाळूने भरलेली वाहने जागच्या जागी सोडून आजुबाजूच्या शेतात पसार झाले होते. विशेष म्हणजे वाळू लिलाव न झालेल्या ठिकाणी प्रवरानदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा सुरु होता. डंपरमधे जेसीबीच्या साहाय्याने वाळू भरण्यात आली होती. यावेळी जिल्हधिकारी महाजन यांनी छापा टाकलेल्या ठिकाणी वाळूचे साठे, विना क्रमांकाचा जेसीबी तर 3 डंपर क्र. एम. एच. 17 एजी 3929, एम. एच 15 सी के 9175, एम. एच. 20 एटी 644, एम एच 16 ए ई 620, एम. एच. 17 एई 9540 असे नंबर असलेले डंपर ताब्यात घेण्यात आले. अन्य डंपर विना क्रमाकांचे असल्याचे दिसून आले. वाहन चालक पसार झाल्याने वाळूने भरलेली वाहने राहुरी तहसील कार्यालयात आणतांना महसूल आणि व पोलिस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली होती. वाळू वाहनावर कारवाई केल्याचे समजताच अनेक वाळू तस्करांनी राहुरी तहसीलच्या आवारात तोबा गर्दी केली होती. याठिकाणी नियमबाह्य वाळू उपसा होत असतांना जिल्हाधिकार्यांनी डोळ्याने बघितले. या ठिकाणाहून बेकायदेशीर अनेक दिवसांपासून वाळू उपसा सुरु असतांना जिल्हाधिकार्यांसह सर्वच यंत्रणेणा याची माहिती नव्हती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्याने ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर निनावी तक्रार तक्रार केली. त्यानुसार जिल्हाधिकार्यांना सकाळीच राहुरी तालुक्यातील आंबी दवनगाव नदीपात्र गाठत कारवाई करावी लागली.
या कारवाईत राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे, श्रीरामपूरचे तहसिलदार सुभाष दळवी, पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ आदींसह लोणी पोलिस, राहुरी महसूल, श्रीरामपूर महसूल, नगर गौण खनिज कर्मचारी सहभागी झाले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवरापात्रात कारवाई करण्याची जिल्हाधिकारी महाजन यांची प्रथमच कारवाई आहे.
पत्रकारांना कारवाईचे फोटो घेतांना जिल्हाधिकार्यांची आडकाठी
जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी प्रवरानदी पात्रात जाऊन वाळू तस्करावर कारवाई सुरु केल्याची माहिती मिळताच काही पत्रकार या नदीपात्रात पोहोचले. या पत्रकारांनी कारवाईचे मोबाईलमधे फोटो घेतले. मात्र फोटो घेत असतांना जिल्हाधिकारी महाजन यांनी फोटो घेऊ नका. आम्ही गेल्यावर नदीचे फोटो घ्या. कारवाई करतांनाचे फोटो हवेत, असे पत्रकारांनी सांगितले असता जिल्हाधिकारी महाजन यांनी पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतला आणि कारवाईचे फोटो डिलिट केले. एकीकडे मुख्यमंत्री, पंतप्रधान, मंत्री कामे करतांना ‘सेल्फी’ काढतात. मात्र जिल्हाधिकारी महाजन यांना यात कोणती बाब खटकली, असा सवाल उपस्थित करीत उपस्थित पत्रकारांनी जिल्हाधिकारी महाजन यांच्या या वर्तणुकीप्रकरणी निषेध नोंदविला.