कोपरगाव / प्रतिनिधी - भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार कोपरगाव येथे भारिप बहुजन महासंघाचे वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये भिमा कोरेगांव दंगलीचे आरोपी मनोहर भिडे व मिलिंद एकबोटेया आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष शरद खरात, तालुकाध्यक्ष बाजीराव रणशुर, शहराध्यक्ष रविंद्र साबळे, गौतम पगारे, इस्माईल मौलाना, संजय भंडागे, दिनेश निकम, आम्रपाली भडांगे आदींची भाषणे झाली. कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. राजेश साळवे, प्रकाश दुंशिग, अनिल बनसोडे, सतीश पवार, दिपक लिहिणार, सिधार्थ बनकर, सतिश गुंजाळ, गणेश रणशुर, रोशन शेजवळ, कैलास भोर आदी उपस्थित होते.
भिडे, एकबोटेंना अटक करा ‘भारिप’चे आंदोलन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:29
Rating: 5