Breaking News

संजीवनी फाऊंडेशन आयोजीत रक्तदान शिबीर व संजीवनी चषकचे उद्घाटन


कोपरगांव: माजी मंत्री व सहकारातील जेष्ठ नेते श्री शंकरराव कोल्हे याच्या ८९ व्या वाढदिवसानिमीत्ताने संजीवनी फाऊंडेशनने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तसेच तसेच वाढदिवसानिमीत्ताने समाजीतील विविध वर्गांसाठी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या संजीवनी चषक अंतर्गत भव्य क्रीकेट स्पर्धांचे उद्घाटनही करण्यात आले. या दोनही उपक्रमांचे उद्घाटन संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांचे हस्ते झाले.

रक्तदानासाठी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक, संजीवनी फार्मसी महाविद्यालय व संजीवनी सिनियर काॅलेजच्या विद्याथ्र्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर प्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री बिपीनदादा कोल्हे, श्री सुमित कोल्हे यांनी रक्तदात्यांची चौकशी करून अभिनंदन केले. संजीवनी ब्लड बॅंकेच्या संचालिका सौ.नीता पाटील यांनी डाॅ. दीपाली आचारी, डाॅ. प्रदिप जाधव, डाॅ. भावना भोसले, डाॅ. कांबळे, आणि डाॅ. जीआ शेख यांचे मदतीने रक्त संकलीत केले. रक्तदान शिबिरासाठी श्री प्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. महेश साळे, प्रा. सोमनाथ विभुते, प्रा. गणेश चांगण, प्रा. शशिकांत होन यांचे सह एन.एस.एस.चे सर्व स्वयंयेवकांनी विशेष परीश्रम घेतले.

सन २०१०0 पासुन श्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसा नि मीत्ताने भव्य क्रीकेटच्या स्पर्धा घेण्यात येतात. यामध्ये जे घटक दैनंदिन कामात व्यस्त असतात व ज्यांना आपल्यातील क्रीकेटच कौशल्य प्रदर्शित करण्यास वेळ मिळत नाही अथवा संधी दुर्मिळ मिळते अशा डाॅक्टर्स, इंजिनिअर्स, कॉट्रॅक्टर्स , विविध ठिकाणचे नोकरदार, व्यापारी अशांचे संघ आमंत्रित करण्यात येतात. असे एकुण २० संघांनी नोंदणी केली आहे. प्रथम विजेत्या संघास रू ५००१ चे बक्षिस देवुन फिरते संजीवनी चषकाने गौरविले जाईल. उपविजेत्या संघास रू ३००१ चे बक्षिस आहे. याच बरोबरोबर बेस्ट प्लेअरसाठी रू. १००१ चे बक्षिस ठेवण्यात आले आहे.

वरील दोनही उपक्रमादरम्यान प्राचार्य डाॅ. डी. एन. क्यातनवार, डाॅ. संजय आरोटे, प्रा. ए. आर. मिरीकर, डाॅ. समाधान दहिकर तसेच श्री डी.एन. सांगळे व विविध विभागांचे विभाग प्रमुखांनी हजेरी लावली. क्रीकेटच्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक गणेश नरोडे, बाजीराव शिंदे , अनिरूध्द जोशी , योगेश अव्हाड व शिवराज पाळणे प्रयत्नशील आहेत. वरील दोनही उपक्रमांचे संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी कौतुक केले.