सोलापूर, दि. 07, मार्च - ज्ञान हे संत साहित्याचे योगदान असून या साहित्यामुळेच मराठी भाषेला श्रीमंती प्राप्त झाली आहे. संत साहित्याचे योगदान हा निरंतर अभ्यासाचा व्यापक विषय आहे. त्यामुळे एका चर्चासत्रात हा विषय अभ्यासला जाणार नाही. त्याकरिता संत साहित्याच्या अभ्यासासाठी स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मितीची गरज असल्याचे प्र तिपादन नामवंत साहित्यिक व समीक्षक डॉ. निशिकांत ठकार यांनी केले. वडाळा येथे माउली महाविद्यालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या वतीने संत साहित्याचे योगदान या विषयावर आंतर्विद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र झाले. उद्घाटन डॉ. ठकार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. झेडपीचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे अध्यक्षस्थानी होते.
संत साहित्याच्या अभ्यासासाठी स्वतंत्र विद्यापीठ हवे - डॉ. निशिकांत ठकार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
18:59
Rating: 5