Breaking News

10 वीच्या बोर्ड परीक्षेस सुरूवात


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी शालांत प्रमाणपत्र परिक्षा 1 मार्च पासून सुरू झाली. तालुक्यातून यावर्षी एकूण 2464 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या शांलातील इ 10 वीच्या केंद्र परीक्षेस मराठी या विषयाच्या पेपरने सुरवात झाली. याच पार्श्‍वभुमीवर जामखेड तालुक्यातील एकूण पाच परीक्षा केंद्रातून या परिक्षेस सुरवात झाली आहे. जामखेड शहरातील ल. ना. होशींग विद्यालय केंद्रातून 405, नागेश विद्यालय केद्रातून 656, तर तालुक्यातील अरणगाव केद्रातुन 336, खर्डा न्यू इंग्लिश स्कूल केंद्रातुन 608 तर नान्नज येथील श्री नंदादेवी विद्यालय या केंद्रातून 459 विद्यार्थी या परीक्षेस सामोरे जात आहेत. 1 मार्च ते 24 मार्च 2018 या कालावधीत ही परीक्षा होत आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त व तणाव मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली आहे. परीक्षा केंद्रावर सर्व घटकांना मोबाइल वापरास बंदी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लघंन करणार्‍यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी तथा परीक्षक जामखेड दत्तात्रय कवळे यांनी दिली असून सर्व 5 ही केंद्रावर संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच सर्व केंद्रावर गुलाब पुष्प देऊन शालेच्या वतीने परीक्षा अर्थी विद्यार्थी चे स्वागत करण्यात आले असून शांततेत परीक्षा पार पाडण्याचे आवाहन केंद्र संचालक कडून करण्यात आले आहे