Breaking News

चालू हंगामात अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात साखर उत्पादन


सातारा - राज्यातील उसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना गतवर्षी पेक्षा चालू हंगामात अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात साखर उत्पादन होत आहे. गतवर्षी 13 फेब्रुवारीअखेर सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांमध्ये 58 लाख 50 हजार 768 मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन 67 लाख 48 हजार 325 क्विंटल साखर उत्पादन झाले होते. तर चालूवर्षी 8 मार्चअखेर 83 लाख 83 हजार 820 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू हंगामात किमान 35 ते 40 लाख क्विंटल साखरेचे अधिक उत्पादन होईल, असा अंदाज क ारखानदारांकडून वर्तवला जात आहे. पुढील हंगामात आजपर्यंतच्या गाळप हंगामाचा उच्चांक निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 14 साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीप हंगामात गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात उसाचे गाळप पूर्ण केले आहे. यामध्ये सर्वाधिक गाळप सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने केले आहे. तर साखर उत्पादनातही सह्याद्री सहकारी साखर कारखाना आघाडीवर राहिला आहे. या पाठोपाठ कृष्णा साखर कारखाना दुस-या स्थानावर आहे. मात्र, सह्याद्रीपेक्षा कृष्णा साखर कारखान्याचा उतारा मात्र अधिक आहे.एका बाजूला साखरेचे उत्पादन वाढत असले साखरेच्या दरात अजून तरी म्हणावी अशी वाढ होत नसल्याने व कारखान्यात तयार होणा-या इतर उपप्रकल्पांनाही दर नसल्याने गाळप झालेल्या उसाचे बिल वेळेत देण्याबाबत कारखानदार उदासीन आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. चालू हंगामाचा शेवट 25 ते 30 एप्रिलपर्यंत होणार असल्याने अजून किमान 55 दिवस चालणा-या जिल्ह्याच्या गाळप हंगामात प्रतिदिन 51 हजार 450 क्षमतेनुसार सर्व कारखाने सुरू राहिले तर किमान 28 लाख क्विंटल साखर उत्पादन वाढू शकेल. मात्र, वाढता उन्हाळा आणि शिल्लक ऊस उत्पादन लक्षात घेता 10 ते 15 लाख क्विंटल असे उत्पादन शक्य आहे. गतवर्षी 67 लाख 48 हजार क्विंटल साखर उत्पादन झाले होते.