Breaking News

मुकूंद प्रतिष्ठान कडून स्पर्धा परीक्षा साठी प्रयत्न पुस्तके भेट


राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे सात्रळ ग्रामपंचायत आणि उत्तर फाउंडेशन पंचक्रोशी यांच्या आयोजित संयुक्त विद्यामानाने कार्यरत झालेल्या सात्रळ स्टडी सर्कल स्पर्धा परिक्षा यासाठी मुकुंद प्रतिष्ठान सात्रळ यांच्या वतीने स्पर्धा परीक्षांची योग्य तयारीच्या उद्देशाने 5 हजार रूपयांची पुस्तके भेट देण्यात आली. त्याप्रसंगी मुकुंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष वाल्मीक वाघचौरे तसेच प्रतिष्ठानसाठी मार्गदर्शन म्हणून असलेले संपत वाघचौरे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनसाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून त्यात उत्तुंग असे यश संपादन करावे. यासाठी लागणारी सर्वतोपरी मदतीचेही आश्‍वासन त्यावेळी दिले. त्यावेळी संपत वाघचौरे, वाल्मीक वाघचौरे, व्यंकटेश सात्रळ कर, मयूर पन्हाळे, पवन भांडवल, अविनाश कडू, श्रेयश सुमारे, प्रशांत वाघचौरे, सचिन पवार आदी उपस्थित होते.