दीनदयाल थालीच्या माध्यमातून गरिबांसाठी पवित्र कार्य - मुख्यमंत्री
नागपूर, दि. 19, मार्च - पंडीत दीनदयाल उपाध्याय यांनी गरिबांच्या सेवेला ईश्वराची सेवा मानली. अंत्योदयाचे व्रत त्यांनी दिले. एकात्म मानव दर्शन घडविले. मराठी नववर्षात श्री सालासर सेवा समितीद्वारे मेयोमध्ये उपचारासाठी येणार्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नाममात्र शुल्क आकारुन दीनदयाल थालीच्या माध्यमातून पवित्र कार्य हाती घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे दीनदयाल थालीचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सर्वश्री गिरीष व्यास, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, कृष्णा खोपडे आदींची उपस्थिती होती.