Breaking News

महावितरणची आर्थिक कोंडी

पुणे : राज्यातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांकडे सुमारे 39 हजार कोटी रुपयांची वीजबिले थकीत असल्याने महावितरणची अतिशय गंभीर स्वरूपाची आर्थिक कोंडी झाली आहे. वीजखरेदीसह ग्राहकसेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या दैनंदिन संचालन तसेच देखभाल व दुरुस्तीवर मोठा परिणाम होत आहे. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी थकबाकी वसुलीची मोहीम महावितरणकडून राज्यभरात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. 

महावितरणवर वाढत्या थकबाकीमुळे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. राज्यातील सर्व प्रक ारच्या सुमारे 1 कोटी 41 लाख ग्राहकांकडे जानेवारी-2018 अखेरीस एकूण थकबाकी 39 हजार कोटी एवढी आहे. या थकबाकीत 57 लाख 56 हजार घरगुती ग्राहकांकडे सुमारे 1 हजार 500 कोटी, 5 लाख 73 हजार वाणिज्यिक (कमर्शिअल) ग्राहकांकडे सुमारे 478 कोटी, 1 लाख 5 हजार उच्च व लघुदाब औद्योगिक ग्राहकांकडे 847 कोटी, 41 हजार सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे सुमारे 1 हजार 500 कोटी, 79 हजार पथदिवे ग्राहकांकडे सुमारे 3 हजार 300 कोटी, 38 लाख कृषी ग्राहकांकडे सुमारे 23 हजार कोटी, 45 हजार 219 यंत्रमाग ग्राहकांकडे सुमारे 938 कोटी, 57 हजार रुपये तर अन्य ग्राहकांकडे सुमारे 79 कोटी रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे. तसेच राज्यात 3 लाख 57 हजार क ायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदार ग्राहकांकडे 7 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे.