Breaking News

‘आप’ मांडणार जनतेच्या न्यायालयात वस्तुस्थिती

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आम आदमी पक्षाचा आत्मविश्‍वास कमालीचा दुणावला आहे. पक्षावर झालेल्या अन्यायाची वस्तुस्थिती जनतेपुढे मांडण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ’आप’च्या 20 आमदारांना लाभाचे पद धारण केल्याप्रकरणी दिलासा दिला. आमदारांना अपात्र ठरवण्याची निवडणूक आयोगाची शिफारस न्यायालयाने फेटाळून लावली. आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारव्दाज यांनी पक्षाचे 20 आमदार आपल्या मतदारसंघात जातील. क शाप्रकारे सुडबुध्दीने आमदारांना लक्ष्य केले जात आहे याची वस्तुस्थिती मतदारांपुढे मांडतील, असे म्हटले आहे.