कोयना नदीत बुडून एकाचा मृत्यू
सातारा, दि. 14, मार्च - कोयनानगरजवळ गोजेगावच्या हद्दीत कोयना नदीत बुडून सुनील किसन कदम या 35 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. याबाबतची खबर वांझोळे गावचे पोलीस पाटील सुभाष लक्ष्मण पाटील यांनी कोयनानगर पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोयनानगर भागातील ऐनाचीवाडी येथील सुनील किसन कदम (वय 35) हा दि. 8 पासून बेपत्ता होता. नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. दि. 11 रोजी गोजेगाव हद्दीत कोयना नदीच्या पाणवठ्यावर एक मृतदेह तरंगत असल्याची खबर वांझोळेचे पोलीस पाटील सुभाष पाटील यांनी कोयना पोलीस दूरक्षेत्रात दिली. पो लिसांनी केलेल्या तपासात हा मृतदेह सुनील कदम याचा असल्याचे निष्पन्न झाले. तो गतिमंद असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हवालदार एस. के. शिकलगार तपास करत आहेत. पाटण ग्रामीण रुग्णालयात कदम याच्या मृतदेहाची उत्तरीय केल्यानंतर त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.