Breaking News

साता-यात तीन जणांवर सावकारीचा गुन्हा दाखल

सातारा, दि. 14, मार्च - शहरात सावकारी किती तळागाळापर्यंत फोफावली आहे. याचा प्रत्यय नागरीकांना चार पाच महिन्यात पोलीसांच्या कारवाईत समोर आला आहे. सावकारी प्रकरणी अनेक ांना मोक्का लावुनही सावकारीची प्रकरणे अजुनही बाहेर येत आहेत. गोडोली येथील रोहित सुरेश शेंडे (वय 28) रा. न्यु विकासनगर सातारा यांने मुद्दल व लाखो रूपये व्याज देवूनही आरोपी राजू नंदकुमार मोरे, तन्वीर शकुर शेख व गणेश मारूती निकम यांनी शेंडे यांच्या घरात घुसुन त्यांना मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवला व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत या तिघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान सावकारी प्रकरणांचा पोलीसांची शोध मोहिम सुरू आहे. सातारा पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी जिल्ह्यातील व सातारा शहरातील सावकारीची पाळेमुळे खोदुन काढण्यासाठी मोहिम हाती घेतल्यामुळे सावकारी करणा-यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जून 2015 मध्ये तन्वीर शेख याने रोहित शेंडे याला वाळु व्यावसायासाठी वीस टक्के व्याजाने 50 हजार रूपये दिले व अवघ्या 12 दिवसांत 1 लाख रूपये वसुलही केले. ऑक्टोबर 2015 मध्ये राजू मोरे कडून रोहित शेंडे याने दहा टक्के व्याजाने 5 लाख रूपये घेतले त्या बद्दल्यात 11 लाख 70 हजार रूपये वसुल केले. तसेच मार्च 2016 रोजी रात्री शेंडे यांच्या घरात घुसून राजू मोरे, तन्वीर शेख व गणेश निकम यांनी शेंडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बंदुकीचा धाक दाखवून आम्हाला पैसे दे अन्यथा कुटुंबासह जीवे मारीन अशी धमकी दिली. याबाबत रोहित शेंडे यांनी अखेर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास फौजदार मोरे करीत आहेत.