Breaking News

स्वत:मधील कलागुण ओळखून त्यात नैपुण्य मिळवण्याचा प्रयत्न करावा


अहमदनगर : प्रतिनिधी  - कोणतीही कला मनुष्याला मनापासून आनंद देणारी असते. आपल्याकडे कलाक्षेत्राला व कलाकारांना मानाचे स्थान असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यातील कलागुण स्वत:च ओळखून त्यात अधिकाधिक नैपुण्य मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अभिनय, गायन या क्षेत्रांमध्ये चांगले काम केल्यास प्रसिध्दी खूप मिळते.चाहत्यांकडून कौतुक होते. ही अतिशय सुखावणारी बाब असते. मात्र त्याचवेळी प्रत्येक कलावंताने आपले पाय जमिनीवरच राहतील, याची कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेत्री दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी यांनी केले.
बेला शेंडे यांनी आपल्या कलाप्रवास उलगडताना घरातून मिळालेले गायनाचे संस्कार महत्त्वाचे ठरल्याचे आवर्जून सांगितले. त्या म्हणाल्या, वयाच्या १६ व्या वर्षी झी सारेगमची मेगा फायनल जिंकताना आलेले अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी बनले. बर्‍याचवेळा हिंदी चित्रपट वर्तुळात मराठी गायकांच्या हिंदी उच्चारांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र, आपण अस्खलित हिंदी शिकलो. दाक्षिणात्य भाषांमध्ये गायन करतानाही त्या भाषेतील बारकावे समजून घेतले. त्यामुळेच हिंदी तसेच दाक्षिणात्य भाषांत गायन करताना कधी अडचण आली नाही. भाषेचा ‘लहेजा’ पकडता आल्यास गाणेही उत्तम होते. ए. आर. रहमान, ईलिया राजा, अजय अतुल अशा दिग्गज संगीतकारांबरोबर काम करण्याचा अनुभव खुप मोलाचा ठरला. ‘नटरंग’मधील गाण्यांमुळे आपल्याला एक वेगळीच ओळख मिळाली. सविता रमेश फिरोदिया यांनी आभार मानले.