Breaking News

मोबाईल अ‍ॅप मध्येही डोंबिवलीकर फास्ट

डोंबिवली : मुंबईमध्ये रेल्वे प्रवासांची संख्या मोठया प्रमाणात असून, सर्वच रेल्वे स्थानकांवर तिकिटासाठी मोठया प्रमाणावर रांगा लागत असे, मात्र यातून पर्याय काढत, रेल्वे प्रशासनाने मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमांतून नियत्रंण मिळविण्यात यश मिळविले आहे. 

मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे आणि सर्वाधिक उत्पन्न देणारे स्थानक म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानकाने सतत तीन वर्षे प्रथम क्रमांक कायम ठेवला. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा वेळ वाचावा, फार वेळ तिकीटांसाठी रांगेत उभे राहू लागू नये म्हणून ’’मोबाईल यु.टी.एस. अ‍ॅप प्रणाली (यु.टी.एस.) सुरु केली. रोज सुमारे पाचशे पेक्षा जास्त प्रवासी डों बिवली रेल्वे स्थानकातून मोबाईल अ‍ॅप खरेदी करत आहेत. डोंबिवली सर्वात पुढे असताना आता मोबाईल अ‍ॅप मध्येही डोंबिवलीकर फास्ट ठरत आहेत.
याबाबत रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेने अत्याधुनिक सुविधा प्रवाशांचा वेळ वाचावा, घर बसल्या तिकीट काढता यावे, रेल्वे स्थानकातील तिकीटांच्या रांगा कमी व्हाव्यात, आणि कमीत कमी कागदाचा वापर व्हावा या उद्देशाने ’’मोबाईल यु.टी.एस. अ‍ॅप प्रणाली सुरु केली आहे. मार्चच्या दहा दिवसातच डोंबिवलीकरांनी या प्रणालीला उत्तम प्रतिसाद दिला आहे. या अ‍ॅपवरुन प्रवाशांना मासिक पास काढता येणार असल्याने पासधाकांसाठी एक चांगली सुविधा झाली आहे.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल अ‍ॅपला डोंबिवलीत अपेक्षेपेक्षा चांगला प्रितसाद मिळत आहे. यामुळे तिकीटांसाठी मोठ-मोठया रांगा लागणे कमी झाले आहे. हा अ‍ॅप डाऊन लोड करण्यासाठी सर्व तिकीट खिडकीजवळ जवळ ’’क्युआर स्कॅनर बसवण्यात आले आहे. तिकीट स्कॅन केले की एका सेकंदाचे आत तिकीट बाहेर येते. काही दिवसात सुमारे रेाज 500 प्रवासी याचा फायदा घेत असून आतापर्यत सुमारे 30 हजार प्रवाशानी याचा उपयोग केला आहे. रेल्वेला सुमारे सव्वा दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मोबाईल तिकीट अ‍ॅपचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वेने केले आहे. त्याशिवाय मोबाईल तिकीट वेडिंग मशिन (एम.टी.यु.एल.) बसवण्यात आले असून याचाही लाभ डोंबिवलीकर घेत आहेत.