Breaking News

दुरसंचार क्षेत्रात पुढील पाच वर्षांत 1 कोटी रोजगार ? दुरसंचार क्षेत्राच्या कौशल्य परिषदेतील अहवालातून स्पष्ट

दिल्ली : गेल्या चार वर्षांपासून रोजगार निर्मितीत सातत्याने होणारी घट चिंतेचा विषय आहे. मात्र दुरसंचार क्षेत्रात पुढील पाच वर्षांत 1 कोटी रोजगार होण्याची शक्यता निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुरसंचार क्षेत्राच्या कौशल्य परिषदेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. दुरसंचार क्षेत्राच्या कौशल्य परिषदेचे सीईओ एस. पी. क ोच्चर यांनी याविषयीची माहिती दिली.

सध्या दुरसंचार क्षेत्रात 40 लाख नागरिक नोकरी करत आहेत. पुढील पाच वर्षात हा आकडा 1.43 कोटींच्या घरात पोहचणार आहे. यावरून येत्या 5 वर्षात 1 कोटी रोजगार निर्माण होणार असल्याचे कोच्चर यांनी सांगितले. मागच्या वर्षी दुरसंचार क्षेत्रातील 40 हजार लोकांना नोकरी गमवावी लागली होती. पुढील सहा महिन्यांमध्ये हा आकडा 90 हजारांच्या घरात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळातंर्गत येत्या काही दिवसांत रोजगारांची मागणी वाढणार असल्याचा दावा क ोच्चर यांनी केला आहे. उद्योग तंत्रज्ञान, मशीन टू मशीन कम्युनिकेशन, दुरसंचार उत्पादन, इन्फ्रा आणि सेवा क्षेत्रातून रोजगाराला वाढती मागणी मिळणार आहे. येत्या काळात उत्पादनवाढीची वाढ होणार असून त्याचा सर्वात जास्त फायदा होणार्‍या क्षेत्रांमध्ये दुरसंचार क्षेत्राचा समावेश आहे. अलीकडेच केंद्र सरकारने दुरसंचार क्षेत्राच्या मजबूतीसाठी विशेष पॅकेजला मंजूरी दिली आहे. या पॅकेजमुळे दुरसंचार क्षेत्राला काहीसा दिलासा मिळत असला तरी प्रत्यक्षात पॅकेजची रक्कम मिळण्यासाठी बराच काळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जीओच्या दुरसंचार क्षेत्रातील आगमनानंतर भावनिश्‍चितीबाबत दुरसंचार कंपन्यांमध्ये युद्ध सुरु झाले. त्यानंतर उत्तम डेटा स्पीड आणि व्हर्च्युअल नेटवर्क प्लॅटफॉर्मला मजबूत ठेवण्यावर प्रत्येक दुरसंचार कंपनीने काम सुरु केले. मात्र त्यामुळे कंपन्यांच्या खर्चासोबतच कर्जातही वाढ होत गेली. त्यामुळेच दुरसंचार क्षेत्रात गुंतवणुक कमी होवून नोक र्‍यांचे संकट वाढ गेले.