Breaking News

अन्यथा सरकार नसबंदीचा निर्णय घेईल : धनंजय मुंडे


राज्यात आणि देशात मांसबंदी आणि नोटबंदी केली तरी जनता सरकारच्या बाजुने आहे असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र, सावध व्हा. सावध झालो नाही तर पुढच्या निवडणुकीपूर्वी नसबंदीचाही निर्णय हे सरकार घेईल, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला लगावला. तुमच्या-माझ्या प्रश्‍नांसंबंधी या सरकारला काही देणंघेणं नाही.मांसबंदी करुन हे सरकार दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप यावेळी मुंडे यांनी केला.