Breaking News

पुढील वर्षी ११ मुलींचे कन्यादान करणार : राऊत

कर्जत प्रतिनिधी - पुढच्या वर्षापासून राऊत कुटूंबाच्यावतीने अभिष्टचिंतन सोहळयानिमित्त गोरगरीब कुटूंबातील ११ मुलींचे कन्यादान केले जाणार आहेत, अशी घोषणा कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केली. कर्जत वकील संघाच्यावतीने राऊत यांचा अभिष्टचिंतन सोहळा वकील बारमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी राऊत यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळासाहेब शिंदे होते.

राऊत म्हणाले, समाजातील ११ मुलींच्या लग्नाचा खर्च करणार आहोत. त्याचबरोबर जिवंत असेपर्यंत प्रत्येक वर्षाला या मुलींना पोटच्या मुलींप्रमाणे घरी बोलवून दिवाळी भेट देण्यात येईल. आदरतिथ्य करून या मुलींना त्यांच्या सासरी पाठवणार आहोत. त्याचप्रमाणे वकील संघाच्या नूतन इमारतीत जागा कमी पडल्यास कर्जत नगरपचांयतमार्फत कमी दरात जागा उपलब्ध करून देवू. सूत्रसंचालन धनंजय राणे यांनी केले. बार असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब बागल यांनी प्रास्तविक केले. संग्राम ढेरे, बाळासाहेब शिंदे यांनी राऊत यांना सुयश चिंतले. यावेळी विठ्ठल गवारे, नवनाथ कदम, नवनाथ फोंडे, ज्ञानदेव काकडे, शरद रसाळ, संजीवन गायकवाड, बाळासाहेब टकले, विशाद मोगल, आनंद साळवे, शरद कदम, आर. आर. जाधव, उत्तम नेवसे, दिपक भंडारी आदी उपस्थित होते. अभय खेतमाळीस यांनी आभार मानले.