Breaking News

लोकपाल विधेयकासह शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत सुरू केलेल्या उपोषणास पाठींबा

तालुक्यातील शेतकर्‍यांसह सामाजिक संस्थांनी एकत्र येत अण्णा हजारे यांच्या लोकपाल विधेयकासह शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत सुरू केलेल्या उपोषणास पाठींबा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागण्या मान्य कराव्यात यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. 

राहुरी तालुक्यातील भारतीय जनसंघ, मातृभूमी व्यसनमुक्ती संस्था, माहिती अधिकार प्रचार व प्रसार संस्था, मराठा सेवा संघ, जिजामात महिला मंडळ, युगंधरा ग्रूप, तालुका वकील संघटना, प्रेस क्लब, ज्येष्ट नागरीक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँगे्रस पाटी आदींसह सर्वच गणेश मंडळाच्यावतीने आण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह विविध संघटनांचे प्रतिनिधींनी राहुरी येथील महसूल व पोलिस स्टेशनला उपस्थिती देत शेतकर्‍यांना हमी भाव, लोकपाल बिल विधेयक संमत करावे, शेतकरी पेन्शन लागू करावी, निवडणूक प्रक्रियेत सुधार करावा आदी मागण्या असलेले निवेदन नायब तहसीलदार गणेश तळेकर, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांना देण्यात आले. संघटनांचे प्रतिनिधी म्हणून कुमार डावखर, साहेबराव गाडे, भाऊसाहेब साबळे, किशोर बाचकर, रविंद्र मोरे, अनिल इंगळे, गोरक्षनाथ दुधाडे, बापूसाहेब कदम, दत्तात्रय मुसमाडे, भाऊसाहेब येवले आदींची उपस्थिती होती.