Breaking News

संजय कोठारी यांनी वाढदिवस वृद्धाश्रमातील वृध्दासोबत साजरा

संजय कोठारी यांनी आपला वाढदिवस वृद्धाश्रमातील वृध्दासोबत साजरा करत एक वेगळाच पायंडा पाडला. येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जैन काँन्फरन्स दिल्लीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


कोठारी यांचे सामाजिक कार्य सर्वश्रुत असुन सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रम आयोजित केले आहते. यामध्ये दि. 3 रोजी सकाळी 11 वाजता येथील शिवनेरी अकॅडमीतील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप, नागेश विद्यालयातील वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप केले असुन निवासी मुकबधीर विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले आहे. सदर कार्यक्राचे अध्यक्ष उमेश देशमुख हे होते. दि. 4 रोजी नळीवडगाव, अंतरवली ता. भुम जि. उस्मानाबाद येथील गहिनीनाथ लोखंडे यांच्या वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टांन्न भोजन व तेथे वृद्धाश्रमात वृक्षरोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वकिल संघटनेचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.हर्षल डोके होते. तर माजी जि. प. सदस्य कांतीलाल खिवंसरा, कॅप्टन लक्ष्मन भोरे, नंदुसिंग परदेशी, रोहिदास केकाण, गणेश देवकाते, नितीन सोळंकी, अनिल फिरोदिया, फारुक शेख, मनोज कुलथे, निलेश तवटे, लियाकत शेख, गणेश भळगट, सुमित चानोदिया, अमोल ताथेड, सरपंच संतोष ढोंबरे, उमेश भोसले, प्रफुल्ल सोळंकी, दत्ता पवार, बाबू केकाण, आण्णा बहिर आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी गणेश भळगट हे दर महिण्याला वीस किलो ज्वारी, सुमित चानोदिया यांनी एक गहू कट्टा, कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी 1050 रुपये, अ‍ॅड. हर्षल डोके व गौरव आरोरा, यांनी 1 ह. रु वृध्दांना दिले. तर दत्ता वडे यांनी दोन ड्रेस दिले. कोठारी हे गेल्या 25 वर्षापासुन विविध प्रकारे सामाजिक कार्य करत आहेत. मोफत रूग्णवाहिका, अपघातातील जखमींना मदत, कैद्यांना मिठाई, लग्न जमविने, अपघात ग्रस्तांना आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थी सत्कार, पाणपोया, अन्याय, आत्याचार, भ्रष्टाचार विरोधी सतत संघर्ष आदींसह विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात.सदरील कार्यक्रमास कोठारी यांच्या मिञ परिवार व चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिष्ठाणच्या वतीने राहुल राकेचा व कांतीलाल कोठारी यांनी आभार मानले.