Breaking News

हेमंत मोरे यांच्या हस्ते खेडला सायकल वितरण


कर्जत तालुक्यातील खेड येथील विद्यार्थ्यांना पंचायत समिती सदस्य हेमंत मोरे यांच्या हस्ते सायकलचे वितरण करण्यात आले. लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात प्राचार्य चंद्रकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाच्या 20 टक्के सेस फंडातून विद्यार्थ्यांना हा लाभ देण्यात आला. माजी पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब मोरे, मारुती सायकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सतिश मोरे, ग्रामविकास अधिकारी अनिल भोईटे, उपसरपंच लक्ष्मण कांबळे, सदस्य धनंजय खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. ज्येष्ठ शिक्षक हसन सय्यद, चंद्रकांत चेडे, काशिनाथ सोनवणे, रूपचंद गोळे, प्रा. महादेव भांडवलकर, प्रा. संदीप भिसे, तात्याराम गावडे, पंकज काराळे, लिपिक विकास कुलकर्णी, नवनाथ गाढवे, बारिकराव शेटे, बापु शेटे, वाल्मिक यादव, पालक प्रकाश सोंडे, सुधाकर शेटे, धोंडीबा शेटे, शिवदास अडसूळ यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.