कुळधरणला मका बियाण्यांचे वितरण
वैरण विकास प्रकल्प अंतर्गत 100 टक्के अनुदानावर 66 लाभार्थींना पाच किलो मका बियाणे तसेच पशुखाद्य उत्पादनासाठी गवत ठोंबाचे वाटप करण्यात आले. कुळधरणचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. विलास राऊत, बंडू सुपेकर, बंटीराजे जगताप, दत्ता शिवाजी जगताप, काकासाहेब जगताप, अतुल जगताप, शिवाजी गजरमल, कर्मचारी सदाफुले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या मागणीवरून वाटपासाठी सोडत पध्दतीचा अवलंब करुन गेल्या वर्षी लाभार्थी निवडण्यात आले होते.
पिंपळवाडी गावातील लाभार्थींसाठी मकामधेनू प्रकल्पातून 28 बॅग मकाचे बियाणे सध्या उपलब्ध झालेले आहे.