गुहामध्ये किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी
तालुक्यातील गुहा येथे दि.6 मार्च रोजी यात्रा उत्सावात नाचण्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 9 जणांना पकडून गजाआड केले आहे. यावेळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रनात आणली.
दि.6 मार्च रोजी राहुरी तालुक्यातील गुहा येथे कानिफनाथांचा यात्रा उत्सव असल्याने जत्रेत छबीना व तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाचण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात दोन गट तयार होऊन तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील सहाय्यक पोलिस आयुक्त सोमनाथ वाकचौरे व राहुरी येथील पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेमध्ये एका गटातील प्रफुल्ल चंद्रभान ओहळ, अजिंक्य राजिंद्र बारसे, अनिल चंद्रभान ओहळ, महेश हिरामण ओहळ, किरण ताराचंद ओहळ या पाच जणांना अटक करुन किरण ओहळ, नारायण ओहळ, रणजित जाधव सर्व राहणार गुहा अशा एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसर्या गटातील सागर ऊर्फ बाळू श्रीपती कोळसे, साईनाथ भाऊसाहेब कोळसे, सोमनाथ शंकर कोळसे, अनिल ऊर्फ एकनाथ लक्ष्मण कोळसे यांना अटक केली, तर सौरभ बबन कोळसे, नवनाथ जालिंदर कोळसे, आकाश श्रीपती कोळसे, नितिन यशवंत कोळसे सर्व राहणार गुहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या परस्परविरोधी दाखल झालेल्या गुन्ह्यात एकूण 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 9 जणांना पकडून गजाआड केले आहे. एका घटनेचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सोमनाथ वाकचौरे तर दुसर्या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलिप राठोड करीत आहे.