Breaking News

रंगपंचमीच्या दिवशीच खर्डा बसस्थानकासमोर दोन गटांत हाणामारी

रंगपंचमीच्या दिवशीच खर्डा येथील बस स्थानकासमोर पुर्व वैमनस्यातुन दोन गटात तुफान हाणामारी झाली. झालेल्या दगडफेकीत अनेक दुचाकी व चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर आठ जण जखमी झाले असून हाणामारी प्रकरणी प्रकाश रामकिसन गोलेकर, प्रफुल्ल भोसले, रूद्राक्ष हुंबे, भावड्या सूरवसे, रोहित गोलेकर, संतोष गोलेकर, चम्या येवले, आकाश खेडकर, काका क्षीरसागर, किरण गोलेकर, काका सूरवसे यांच्यासह इतर 20 ते 25 जणांवर जामखेड पोलिस स्टेशनला रात्रीच गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. 


जामखेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी करण संतोष चौघुले ( वडारगल्ली खर्डा ) याने फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 6 मार्च रोजी रंगपंचमी असल्याने मित्रांबरोबर खर्डा बस स्थानक परिसरात रंग खेळत असतांना आचानक वरील आरोपींनी येऊन दगडफेक केली. लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी काही लोक मध्यस्थी करत भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही दगडाने दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी केले. त्याठिकाणी असलेल्या चारचाकी वाहनांची व मोटारसायकलीचीही मोडतोड करून मोठे नुकसान केले. यावेळी बस स्थानक परिसरात भयभीत वातावरण निर्माण झाले होते. अचानक झालेल्या मारहाणीत प्रकाश सूरवसे, राजकुमार चौघुले, अनूष चौघुले, रघुनाथ सूरवसे यांच्यासह 8 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन दंगलसदृश्य मारहाण दगडफेक आटोक्यात आणली.